Breaking News

सुरई येथून गुन्ह्यातील जप्तीचा माल लंपास

रेवदंडा : प्रतिनिधी – गुन्ह्यामध्ये सील केलेला माल लंपास केल्याची घटना मुरूड तालुक्यातील सुरई येथे घडली असून रेवदंडा पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2029 कलम 8 (क) 22,29, पोलीस एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट 1986 या गुन्हातील सील केलेला माल दयानंद साळवी (रा.कोलशेत रोड, ठाणे) यांचे परवानगी शिवाय 27 फेब्रुवारी दुपारी अकरा ते 8 मे दुपारी साडेबाराचे दरम्यान बोर्ली नजीक सुरई येथून सिलबंद रूमचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. या सिलबंद रूममधून पाचशे रूपये किंमतीचा जुना वापरता लोखंडी बेड, रूपये तीन हजार किमंतीचा जुना वापरता फ्रिज, चारशे रूपये किमंतीच्या जुन्या वापरत्या दोन प्लॅस्टिक खुर्च्या, रूपये एक हजार किंमतीचा जुनी वापरतील शेगडी व गॅस सिलिंडर, एक हजार किंमतीचे जेवण तयार करण्यासाठी लागणारी जुनी भांडी, दोन रूपये किमंतीच्या एक हजार लिटरच्या पाण्याच्या दोन प्लॅस्टिक टाक्या असे एकूण सात हजार नऊशे रूपये किंमतीचा माल लंपास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरीच्या हेतूने चोरीस नेला.

या चोरीबाबत दयानंद साळवी यांनी नोंदविलेल्या फिर्यादीनुसार रेवदंडा पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे अज्ञात चोरटयांचे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक हर्षद हिंगे करीत आहेत.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply