नवी मुंबई : प्रतिनिधी
मलेशिया येथे होत असलेल्या मलेशिया ओपन कराटे चॅम्पियनशीप 2019 या स्पर्धेसाठी नेरूळ येथील साई स्पोर्ट्स अकादमीच्या 14 खेळाडूंची निवड झाली असल्याची माहिती प्रशिक्षक मनीषा पाटणे व अमर पाटणे यांनी दिली. या स्पर्धेत काता व कुमाते या प्रकारात स्पर्धा होणार आहेत. मलेशिया येथील सुबा कराटे अकॅडमी इंडो-मलेशया या संस्थेतर्फे 5 मे रोजी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मलेशिया येथील स्लेगोर दारुल इहसन येथे स्पर्धेचे ठिकाण आहे.
