पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदी अॅड. नरेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी हर्षधा उपाध्याय यांची निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 12) आपल्या दालनात पदग्रहण करून आपला पदभार स्वीकारला त्यानिमित्त महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, प्रमिला पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक संतोष शेट्टी, माजी प्रभाग समिती सभापती तथा नगरसेवक समीर ठाकूर, अजय बहिरा, मनोज भुजबळ, अनिल भगत, नगरसेविका चारुशीला घरत, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, भाजप नेते सदानंद पाटील, कमलाकर घरत, अमर उपाध्याय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.