Breaking News

नवी मुंबईतील स्वच्छ सर्वेक्षणाला हरताळ

सीवूड्स रेल्वे स्थानकातील शौचालये बंद; सिडकोचे दुर्लक्ष

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई पालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू झाली आहे. यात शहर सुशोभीकणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासोबत शहर स्वच्छतेकडेदेखील पालिकेने लक्ष दिलेले आहे. पालिका नागरिकांकडून शहरात स्वच्छता राखण्यासाठी धडे गिरवत असताना; दुसरीकडे सिडकोसारखी इतर प्राधिकरणे मात्र पालीकेला साथ देत नसल्याचे  दिसून येत आहे. सीवूड्स या रेल्वे स्थानकात पूर्व व पश्चिम अशा दोन्ही ठिकाणांची टॉयलेट्स बंद आहेत. रेल्वे स्थानकातील देखभाल दुरुस्ती सिडकोकडे आहे. मात्र सिडकोकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

थानकातून प्रवास करणार्‍या शेकडो नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. जास्त त्रास महिलांना होत आहे. कोणतीही इतर व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले असून नैसर्गिक विधी लागलली व्यक्ती स्थानकाबाहेर इतर व्यवस्था शोधत असल्याचे चित्र सध्या सिवूड स्थानकात दिसून येत आहे.

एमएएमआरमधील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक असलेल्या सिवूड रेल्वे स्थानकात प्रवाशांची कुचंबणा होऊ लागली आहे. या रेल्वे स्थानकातील दोन्ही दिशांची चारही टॉयलेट बंद आहेत. त्यामुळे नागरिक उघड्यावर नैसर्गिक विधी करत असल्याचे आढळून आले आहे. सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाच्या या शोकांतिकेकडे मात्र या रेल्वे स्थानकाची जबाबदारी असलेल्या सिडकोचे दुर्लक्ष होत आहे. हजारो नागरिक या स्थानकातून  प्रवास करतात. या रेल्वे स्थानकावर बनलेल्या मॉलमध्ये मुंबई, ठाणे, पनवेल व उरणमधून नागरिक येत असतात. मॉलमध्ये येण्यासाठी रेल्वे स्थानकातून प्रवास केला जातो. त्यामुळे अशा नागरिकांसाठी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे टॉयलेट बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेर येऊन टॉयलेटसाठी जागा शोधावी लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या चुकीमुळे पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला प्रवाशांकडून नाईलाजस्तव हरताळ फासली जात आहे.

नवी मुंबई महापालिकेत सिडको, एमआयडिसी अशी प्राधिकरणे आहेत, मात्र त्यांच्याकडून कायम पालिकेला कोणतीही स्थ मिळत नसल्याचे दिसून येत होते. त्यात सिवूड रेल्वे स्थानकात बंद असलेल्या टॉयलेटमुळे हे सिद्ध झाले आहे. सिडकोकडून एकाचवेळी ती टॉयलेट का बंद ठवेली आहेत? असा प्रश्न पडतो. जात दुरुस्तीसाठी ठेवली असल्यास तिथे तास फलक का लावला गेला नाही? जर खरोखर दुरुस्तीसाठी टॉयलेट बंद ठवल्यास मोबाईल टॉयलेटसारखी पर्यायी व्यवस्था पालिकेशी संपर्क साधून प्रवाशांना उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

टॉयलेट काही कारणास्तव बंद आहेत, मात्र काही दिवसांत जे टॉयलेट तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात येईल.

-कल्याण पाटील, सिडको अधिकारी

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply