Breaking News

पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात; पालीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍याला पाच हजाराचा दंड

पाली : प्रतिनिधी

पोलिसांबरोबर हुज्जत घालणार्‍या वाहनचालकाला पाली येथील कनिष्ठ न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पालीसह सुधागड तालुक्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान वाहनचालकांची कागदपत्रे व लायसन्स तपासले जात आहेत. पाली-खोपोली मार्गावरील गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (वय 38) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 12 आरव्ही 7379) चालवित होते. पोलिसांनी त्यांच्याकडे कागदपत्रे व लायसन्स मागताच त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी बिरप्पा पुजारी यांना पाली येथील कनिष्ठ न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने पुजारी याला पाच हजाराचा दंड ठोठावला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply