Breaking News

दफनभूमीतील दिवे त्वरित सुरू करावेत; नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

शहरातील से 14 मधील स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीतील लाईट बंद असल्याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो) यांना निवेदन देऊन ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. खारघरमधील सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीतील लहान मुलांच्या दफनभूमीत हायमास्ट आहे, पण त्या हायमास्ट पोलचे दोन लाईट बंद आहेत, तसेच त्या ठिकाणी असलेले दोन लाईटचे पोलदेखील बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी रात्री दफन करण्यासाठी आलेल्या प्रेताचा दफनविधी तेथील कर्मचार्‍यांना अक्षरशः आपल्या मोबाइल बॅटरीच्या उजेडात करावा लागतो. परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेता नगरसेविका नेत्रा पाटील यांनी त्वरित ते सिडकोचे कार्यकारी अभियंता ए. टी. गायधनकार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या ठिकाणी नादुरुस्त असलेले लाईट व पोल दोन्ही सुरू करण्यात यावे, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली. या ठिकाणी अंधार असल्याने साप, विंचू व इतर प्राण्यांची देखील भीती कर्मचारी व दफन करण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांना असते. भविष्यात काही अनुचित प्रकार घडण्याआधी आपण त्वरित योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशीही मागणी शेवटी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी निवेदनात केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply