Breaking News

खराब हवामानामुळेच रावत यांचा मृत्यू; हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात समितीचा प्राथमिक अहवाल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की, हा अपघात नेमका झाला कसा आणि कशामुळे झाला? या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अपघाताच्या तपासाअंती समितीने दिलेल्या अहवालात म्हटलेय की, या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा कट होता किंवा कुठला तांत्रिक बिघाड हेलिकॉप्टर होता वा कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष झाले होते, अशी कोणतीच बाब समोर आलेली नाहीये. तामिळनाडू राज्यातील खोर्‍यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने हेलिकॉप्टर ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे चौकशी पथकाने सांगितले आहे. अचानकपणे क्लायमेट बदलले आणि हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते पायलटच्या नियंत्रणात न राहता ढगामध्ये गेल्याने त्याचा मार्ग भटकल्याचा अहवाल समोर आला आहे. या समितीने सगळ्या बाबींची मदत घेऊन घटनेशी निगडीत लोकांची साक्षही नोंदवली आहे. त्यातूनच हा अहवाल त्यांनी मांडला आहे. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाडकिंवा कटकारस्थान नसल्याची माहिती समोर आली आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाचा हा अधिकृत निष्कर्ष आहे. या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. यातून या अपघाताचे कारण काय असू शकते याचा अंदाज घेण्यात आला. चौकशीत मेकॅनिकल फेल्युअर म्हणजेच यांत्रिक बिघाडाचा मुद्दा फेटाळण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम …

Leave a Reply