कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथे विविध नागरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महापलिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकार्यांना या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कळंबोलीमधील नागरिकांना रस्ते, गटार, ड्रेनेज, सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांटड आणि फूटपाथच्या समस्या भेडसावत आहेत. त्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना या समस्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेवक अमर पाटील, उपायुक्त सचिन पवार, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपस्थित होते.