Breaking News

आमदार महेश बालदी यांचा धडाका; मोहपेत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत पनवेल तालुक्यातील मोहपे येथे साकारणार्‍या 50 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 15) झाला.
वास्तविक आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा करून ही योजना अंमलात आणली असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील यांनी केला, मात्र नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून येथील ग्रामस्थांनी केंद्र सरकार तसेच आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.
देशातील ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्याने समृद्ध करण्यासाठी जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
वाढत्या लोकसंख्येसोबत जलसंकटही वाढत असून ही समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2019मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर एक भव्य योजना सुरू केली. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मोहपे येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आणला.
या योजनेच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ शनिवारी आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, राकेश गायकवाड, आत्माराम हातमोडे, माजी सरपंच आशा म्हसकर, युवा नेते प्रवीण ठाकूर, योगेश लहाने, अनिल पाटील, राजेश लबडे, तानाजी पाटील, महेंद्र गोजे, अनिल भोईर, अशोक भोईर, सचिन पाटील, वामन पवार, संकर पवार, नामदेव पवार, आदेश पवार, सुनील दळवी, प्रकाश म्हसकर, उमेश पवार, चेतन पाटील, जगन पाटील, राकेश ठाकूर, संभाजी पाटील, हरी पवार, सखाराम पवार, दत्ता पवार, मंदार चोरघे, विनायक पवार, प्रतीक पवार, निखिल पवार, किसन पवार, विवेक पवार, शरद पवार, पांडुरंग पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply