Breaking News

पोलादपूरात शिवसेनेने विकासकामेच केली नाही -अदिती तटकरे

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्याची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूरचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यावर शिवसेनेने शहरीकरणासाठी विकासकामे केली नाहीत, याची मतदार जनतेत तीव्र नाराजी आहे, अशी खंत रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 10च्या उमेदवार शुभांगी चव्हाण, प्रभाग 8 च्या उमेदवार अनिता जांभळेकर, प्रभाग 14च्या उमेदवार प्रतिक्षा भुतकर आणि प्रभाग 2चे उमेदवार अल्पेश मोहिते यांच्या प्रचाररॅलीनंतर पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण आणि प्रभाग 8 मध्ये अनिता जांभळेकर यांच्या प्रचाराची सभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

माजी सभापती दिलीप भागवत यांनी शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर विकासकामे तर केली नाहीच परंतू जे काही 50 नारळ फोडले त्याची विकासकामेही न केल्याने मतदारांचा हिरमोड झाला आहे, असेही अदिती तटकरे या वेळी म्हणाल्या.

या वेळी व्यासपीठावर माजी सभापती दिलीप भागवत, उपसभापती शैलेश सलागरे, शहरअध्यक्ष अमोल भुवड, तालुकाअध्यक्ष अजय सलागरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहरअध्यक्ष अजित खेडेकर, श्रावणी शहा तसेच उमेदवार उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply