Breaking News

रायगड जिल्ह्यात भविष्यात माणगाव पॅटर्न

रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीसाठी घेतलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेन दुसर्‍या क्रमांकावर आहे. शेकाप तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसची होत असलेली पिछेहाट याही निवडणूकी दिसली. सर्वात महत्त्वाचे म्हाणजे दक्षिण रायगडात भाजपची एकही जाग नव्हती. या निवडणूकीत कमळ चिन्हावर सहा जागा जिंकून भाजपने  आपले अस्तित्व दाखवून दिले. जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, तळा, म्हसळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होत होती.  सहा नगरपंचातींमध्ये एकूण 102 जागांसाठी ही निवडणूक झाली. त्याचे निकाल बुधवारी (दि. 19) जाहीर झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 38, शिवसेनेचे 35, शेकापचे 12, काँग्रेसचे आठ, भाजपचे सहा तर इतर तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. शिवसेनेच्या हातून तळा नगरपंचायत गेली.   खालापूरमध्ये शेकापने बहूमत गमावले आहे. माणगावमध्ये राष्ट्रवादी काँगेसची सत्ता गेल्यात जामा आहे. पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने वर्चस्व राखले. पोलदापूमध्ये शिवसेने आपला गड राखला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील तळा, म्हसळा आणि माणगाव या तीन नगरपंचायतींमध्ये निवडणूक झाली. तेथील निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. तळा नगरपंचायत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून हिसकावून घेतली. तर म्हसळ्यात राष्ट्रवादीने आपली सत्ता राखली. मात्र माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. माणगाव नगरपंचायत राखण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. तेथे माणगाव विकास आघाडीने बहुमत मिळवले आहे. दक्षिण रायगडमध्ये भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. भाजपने या निवडणुकीत कमळ चिन्हावर सहा तर इतरपक्षांशी झालेल्या आघाडीत दोन जागा जिंकल्या आहेत. एकूण आठ जागा जिंकून भाजपने दक्षिण रायगडमध्ये आपले अस्तीत्व दाखवून दिले आहे. भाजपचे  तळा येथे तीन, पाली येथे दोन तर पोलादपूर येथे एक नगरसेवक निवडून आला आहे. तळा नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता होती. रवी मुंढे यांनी शिवसेना सोडल्यामुळे तेथील शिवसेनेची सत्ता गेली. तळा येथे शिवसेना व भाजप या दोन पक्षांच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.  रायगड जिल्ह्यात पूर्वी काँगे्रस आणि शेकाप या दोनच राजकीय ताकदी होत्या. परतु हळूहळू या दोन्ही पक्षांचा प्रभाव कमी होतोय, हे सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्षांची पिछेहाट झाली. शेकापची खालापूरमध्ये सत्ता होती. परंतु त्यांनी तेथे बहुमत गामावले आहे. या नगरपंचायतीत शेकापचे सात शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. माणगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील ही मोठी नगरपंचायत.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी माणगावची निवडणूक प्रतिष्ठेची होती. मागील काही वर्षापासून येथे नगरसेवक फोडाफोडी होत होती. ही नगरपंचायत जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पूर्ण ताकद लावली होती. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे तिघेही माणगावमध्ये तळ ठोकून बसले होते. परंतु येथे सत्ता राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अपयशी ठरली आहे. तेथे शिवसेना, काँग्रेस व भाजप यांची माणगाव विकास आघाडी होती. या आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र लढले असते तर या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असते. आणखी काही धक्कादायक निकाल पहायला मिळाले असते. रायगडातील शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादी विरोधात रायगडातील शिवसेनेच्या आमदारांनीदेखील  आवाज उठवून नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द शिवसेने जशी नाराजी आहे, तशीच   काँग्रेसमध्येदेखील आहे. भविष्यात रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष माणगाव पॅटर्न राबवू शकतात. माणगावमधील निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सूचक इशारा आहे. शेकाप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना आता नव्याने विचार करण्याची गरज आहे, हे या निवडणुकीने दाखवून दिले.

पोलादपूरमध्येे  शिवसेना 10, भाजप एक, काँग्रेस सहा, तळा नगरपंचायतीत शिवसेना चार, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप तीन, माणगावमध्ये आघाडी सात, राष्ट्रवादी काँग्रेस सात, शेकाप एक, इतर दोन, म्हसळा नगर पंचायतीमध्ये शिवसेना दोन,  राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस दोन, खालापूरमध्ये शिवसेना आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, शेकाप सात तर पाली नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहा, शेकाप चार, शिवसेना चार, भाजप दोन, अपक्ष एक नगरसेवक निवडून आले आहेत.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply