Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन स्पर्धांचे ‘सीकेटी’त पारितोषिक वितरण

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस झाला. यानिमित्त ऑनलाइन घेतलेल्या स्पर्धांमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 6) प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून झाला.

या वेळी सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पारितोषिक वितरण सोहळ्यास सीकेटीच्या इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मिताली म्हात्रे, तसेच चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply