Breaking News

बीसीसीआय पदाधिकार्‍यांना इंग्लंडवारीस परवानगी

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्‍यांच्या परदेश दौर्‍यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते, पण आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून, ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचा कारभार हाकणार्‍या प्रशासकीय समितीने आपल्या सदस्यांसाठी जून-जुलै महिन्यात रंगणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विनोद राय, रवी थोडगे, डायना एडल्जी या प्रशासकीय समितीच्या सदस्यांसह बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी उपस्थित होते. जर प्रशासकीय समितीतील एखाद्या सदस्याला आयसीसी विश्वचषक पाहण्यासाठी प्रवास करण्याची इच्छा असेल, तर ते जाऊ शकतात. बीसीसीआय त्यांचा सर्व खर्च उचलेल. यापूर्वी बीसीसीआयचे पदाधिकारी परदेश दौर्‍यावर जात असत, त्याचप्रकारे प्रशासकीय समिती सदस्यांसाठी हा परदेश दौरा असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply