Breaking News

इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 23) इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. याच ठिकाणी नेताजींचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या नावाने आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, स्वांतत्र्याच्या नायकाला ही आदरांजली आहे. नेताजींचा पुतळा आपल्याला राष्ट्रीय कर्तव्याची आठवण करून देईल. येणार्‍या पिढीला प्रेरणा देईल. गेल्या वर्षीपासून नेताजींची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज यानिमित्ताने आपदा प्रबंधन पुरस्कार दिले गेले आहेत. नेताजींकडून प्रेरण घेऊनच हे दिले गेले आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply