मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवार (दि. 24)पासून पुन्हा सुरू होणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे वर्ग भरणार आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये कोविड-19 विषाणूची थोडीही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शासनाच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.