पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छतेने परिपूर्ण प्रभाग कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली रोडपाली प्रभाग क्रमांक 7 येथे रविवारी (दि. 30) सेक्टर 8ई धरण तलाव (होल्डिंग पॉईंट) येथे विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम घेण्यात आली. पनवेल महापालिका व साई समाज विकास संस्था (नेरूळ), गंगा सागर फाऊंडेशन (नेरूळ), क्रीट टोगेथेर फाऊंडेशन (कळंबोली) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता राबविण्यात आली. या वेळी सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू सिन्हा, अभिजित चव्हाण, दीपक विश्वकर्मा, तसेच प्रभाग समिती ‘ब’चे आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता पर्यवेक्षक हरेश कांबळे व नागरिक तसेच तिन्ही संस्थेचे संपूर्ण टीम व सुपरवायझर हर्षद पाटील, अक्षय पाखरे व स्वच्छतादूत उपस्थित होते.