Monday , June 5 2023
Breaking News

‘दिशा’कडून विधवांना हळदी कुंकवाचा मान

पनवेल : वार्ताहर

दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू समारंभ ‘ती’च्या नजरेतून या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदीकुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली.

पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा  हीच भावना ठेऊन हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत गॅलेक्सी सर्फक्टंट्स लि. सीएसआरचे प्रमुख आदर्श नायर व चिरायू हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. स्वाती हांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी डॉक्टरांनी माहिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन केले तर आदर्श नायर यांनी उपक्रमाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणासाठी सदैव व्यासपीठाबरोबर नेहमीच काम करू, असेही आश्वासन दिले.

गॅलेक्सी सर्फक्टंट्स लिच्या अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी कंपनीच्या मॅनेजर वैशाली जुमडे व टीमच्या मार्गदर्शनाने महिलांना साबण बनवणे, डिशवॉश लिक्विड, डिटर्जंट लिक्विड, हॅन्डवॉश लिक्विड बनविण्याचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले व त्यांचबरोबर घरी पाच साबण बनवता येतील एवढे साहित्याही महिलांना देण्यात आले. पुढील काळामध्येही असे वेगवेगळे प्रशिक्षण देऊन महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी व्यासपीठातून प्रयत्न केले जातील असे दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी या वेळी सांगितले.

’ती’ च्या अस्तित्वाच हक्काच व्यासपीठ असल्यामुळे त्या प्रत्येक महिलेला व्यासपीठावर मानसन्मान दिला जातो. व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.

महिलांनच्या व्यवसायाबद्दल माहिती सांगून त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू असेही या वेळी त्या म्हणाल्या. खुशी सावर्डेकर यांनी आभार प्रदर्शन करत  व्यासपीठाच्या सख्यांच्या सहकार्याने उत्तम जबाबदारीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply