Breaking News

अडकलेल्या ट्रेकर्सची आठ तासांनंतर सुटका; यशवंती हायकर्स, निसर्ग मित्र मदतीला

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पेणमधील तिघा जणांच्या नवीन वाट शोधण्याचे साहस चांगलेच अंगलट आले. तब्बल आठ तास दरीच्या मध्यावर अडकल्यानंतर मदतीला आलेल्या खोपोलीतील यशवंती हायकर्स, पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी, तसेच स्थानिकांनी तिघा पर्यटकांची सुटका केली. रविवारी पेण येथून दहा तरुण वडगाव (ता. खालापूर) येथील माणिकगडावर ट्रेकसाठी आले होते. त्यापैकी रोशन अहिरे, देव पटेल व हर्ष कांबळे यांनी माणिकगडावर जाण्यासाठी नेहमीचा मार्ग न निवडता अवघड मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. इतर सात जण नेहमीच्या मार्गाने गेले. काही अंतर गड चढल्यानंतर ते तिघे पर्यटक एक बाजूला दरी असलेल्या ठिकाणी अडकून बसले. नवीन वाट शोधण्याचे साहस अंगलट येऊन आपण अडकून बसल्याचे त्या तिघांनी इतर सात मित्रांना कळवले. त्यानंतर तिघांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वडगाव ग्रामस्थांशी संपर्क साधून मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, खोपोलीतील यशवंती हायकर्सचे महेंद्र भंडारे, मच्छिंद्र यादव, समीर वाडेकर, तुषार सावंत, इंद्रनील खुरांगले, अरविंद पाटील, योगेश घरत, प्रणीत गावंड, संजय गीलब्बिले, भावेश शिर्के, रूपेश जाधव, संदीप पाटील, पद्माकर गायकवाड तसेच निसर्गमित्र संस्थेचे प्रिसिलिया मदन, अक्षय देशमुख, किशोर म्हात्रे आणि वडगावमधील भूपेंद्र जांभूळकर, स्वप्नील पाटील, राहुल जांभूळकर आणि कृष्णा गडगे दोराच्या सहाय्याने अडकलेल्या तिघांपर्यंत पोहचले. जवळपास आठ तासांनंतर तिघांना सुखरूप सुरक्षित खाली आणले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply