Breaking News

म्हसळ्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

म्हसळा : प्रतिनिधी

शासनस्तरावर राबविण्यात येणारे विविध उपक्रम गावाची, तालुक्याची संस्कृती विकसित करीत असते. येथील नागरिक निर्सगाच्या सान्निध्यात आहेत, त्यांनी तो निसर्ग वाचायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन म्हसळ्याचे तहसीलदार समीर घारे यांनी येथे केले. महसूल विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून म्हसळा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये नुकताच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार समीर घारे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. जिल्हाधिकार्‍यांनी सुरू केलेल्या यूपीएससी, एमपीएससीच्या गरूडझेप अंर्तगत कार्यक्रमालाही म्हसळ्यातून चांगली साथ मिळत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र जाधव, मराठी विभाग प्रमुख प्रा. दिगंबर टेकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, सभापती छाया म्हात्रे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, शाहीन केजीचे डॉ. मुब्बशीर जमादार, केंद्र प्रमुख किशोर मोहिते,  वनविभागाचे सूर्यतळ, अतुल अहिरे, प्रियांका चव्हाण आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. तत्पूर्वी म्हसळा तहसील कार्यालय ते सार्वजनिक वाचनालय अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. पोलीस स्टेशन, वनविभाग, नगरपंचायत, केंद्रशाळा, तहसीलदार निवासस्थान, पंचायत समिती कार्यालय, एकात्मिक बालविकास केंद्र येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी पालखीतील ग्रंथांचे पूजन करण्यात आले. म्हसळा सार्वजनिक वाचनालयाने या वेळी पुस्तक प्रदर्शन व कव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी आठ विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply