Breaking News

शिरढोणमध्ये गॅस गिझरचे वाटप

पनवेल : वार्ताहर

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत वन्यजीव ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्या अंतर्गत ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण यांच्या वतीने शिरढोण ग्रामपंचायत हद्दीतील 76 लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानात गॅस गिझरचे वाटप करण्यात आले.

शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. 4) हा कार्यक्रम झाला. पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवण्यासाठी वन विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येणार्‍या उपक्रमांबाबत मंगेश वाकडीकर यांनी वन अधिकार्‍यांचे आभार मानले तसेच गॅस गिझरविषयी उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली.

या आधी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या माध्यमातून 325 कुटुंबाना गॅस सिलिंडर, 98 महिलांना शिलाई मशीनचेदेखील वाटप करण्यात आले आहे. या वेळी कर्नाळा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वनपाल वाघमारे, वनसंरक्षक जाधव, सरपंच साधना कातकरी, उपसरपंच मोनाली घरत, सदस्य प्रमोद कर्नेकर, विजय भोपी, भाऊ वाजेकर, निकिता चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply