Breaking News

इंधन दरकपातीने राज्यात दिलासा

पेट्रोल प्रतिलिटर पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

मुंबई ः प्रतिनिधी

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी केली. राज्य मंत्रीमंडळाची गुरुवारी (दि. 14) बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यांनी राज्य शासनालादेखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करून इंधनाचे दर कमी केले होते, मात्र महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते. आपल्या युतीच्या सरकारने ठरवले आहे की, राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारचा नागरिकांना दिलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधन दर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर गुरुवारी निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचे म्हटले. या वेळी फडणवीस याांनी आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्या लोकांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार असल्याचेही म्हटले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण देत ही पेन्शन योजना बंद केली होती.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला …

Leave a Reply