Breaking News

खांदा कॉलनीत पोळी भाजी, स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील श्रीकृष्णा गार्डन सोसायटी  येथे कुणबी समाज संस्था, पनवेल यांच्या महिला विभाग पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन श्री अन्नदा पोळी भाजी आणि स्नॅक्स कॉर्नर सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 4) माघी गणेशोत्सव दिनी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुणबी समाजोन्नत्ती संग- मुंबईचे कार्यकारी सदस्य तथा कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष, उद्योजक कृष्णा कोबनाक, कार्य-सदस्य तथा कोकण बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अथवा सहकार क्षेत्रातील नामवंत एकलव्य युनिव्हर्सल सहकारी पतसंस्था, मुंबईचे संस्थापक संभाजी काजरेकर उपस्थित होते. कुणबी समाज संस्था पनवेलचे अध्यक्ष रमेश फलसमकर, सचिव अनिल मोंडे, विवाह मंडळ अध्यक्ष बबन मांडवकर, उदय महादे, ‘म्हसळा टाईम्स’चे संपादक रमेश पोटले, अनंत इर्मल, चाचले हे उपस्थित होते. विशेष उपस्थिती योगिता मॅडम, एकलव्य सहकार परिवार यांची लाभली.

या सोहळ्यासाठी श्री अन्नदाच्या प्रमुख निमंत्रक आणि कुणबी समाज संस्था, पनवेलच्या महिला अध्यक्ष लिना महेंद्र रटाटे व संध्या उदय महादे आणि त्यांचे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुजुर्ग अध्यक्ष फलसमकर व ध्येयवादी नेतृत्व अनिल मोंडे यांचे योगदान होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply