Breaking News

गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या विशेष विषयनिहाय मार्गदर्शनपर व्याख्यानांची मालिका नुकतीच

सुरू झाली.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य  अरुणशेठ भगत यांच्या संकल्पनेतून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पनवेल येथील चांगू काना ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापक या मालिकेअंतर्गत मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये अर्थशास्त्र या विषयाचे प्रा. प्रदीप देशमुख, अकाऊंन्टसी या विषयाचे प्रा. शशिकांत भोसले तर इंग्रजी या विषयासाठी प्रा. उत्तमराव औटे यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. इतिहास विषयाचे व्याख्यान प्रा. माणिक घरत यांनी घेतले.

या सर्व प्राध्यापकांचे विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे यांनी स्वागत केले. जुनियर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रमोद कोळी, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव या वेळी उपस्थित होते. ज्युनिअर कॉलेजचे सर्वश्री प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा. उमेश पाटील, प्रा. राजू खेडकर तसेच प्रा. अर्चना पाटील, प्रा. जयवंती ठाकूर, प्रा. माणिक घरत आदी व बारावीच्या बोर्ड परीक्षेला प्रविष्ठ असणारे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply