Breaking News

मतदारांसाठी आयोगाची हेल्पलाईन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे.

आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत.याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्हयात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते. नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे, नवीन मतदार नोंदणी सोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन, मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र व मतदान अर्जा निगडित सर्व माहिती, ही या हेल्पलाईनची वैशिष्ट्ये आहेत. या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील,मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी,निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल अ‍ॅप किंवा ुुु.र्पीीिं.ळप पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येत आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply