Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मुलाखत प्रशिक्षण

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवसायिका शिक्षण शाखेतील तसेच तंत्रशिक्षण व पारंपारिक शाखेतील विद्यार्थ्यांच्या मुलाखतीविषयी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी इंग्लिश असोसिएशनच्या अंतर्गत गुरुवारी (दि. 3) मुलाखत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी इंग्लिश असोसिएशच्या डॉ. महादेव चव्हाण यांनी समिती स्थापन केली त्यामध्ये महाविद्यालयातील विविध शाखांच्या प्राध्यापकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल कांबळे, प्रा. सुहास धानवे, प्रा. मानसी शाह यांनी केले. मुलाखतीची रुपरेषा व त्यावरील विचारविनिमय करण्यासाठी मुलांना प्रेरित करण्याचा संकल्प समोर ठेवून समितीने विदयार्थ्यांच्या विविध स्तरांवरील प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मुलाखतीविषयीची प्राथमिक भीती दूर करण्याचे कार्य केले.

महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. संजय मराठे यांनी कार्यक्रमाच्या अहवालाचे अवलोकन केले. त्यांनी मुलाखत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा वृतांत पडताळून, प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वाढावी या दृष्टीने त्यांना वैयक्तिक अभिप्राय देण्याचे सुचित केले.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply