Breaking News

पटेल ज्वेलर्सच्या दागिन्यांची कमी किंमत आणि योग्य भाव

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील पटेल ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये ग्राहकांची  खरेदी सुलभ व कमीत कमी योग्य किंमतीत व्हावी म्हणून या पुढे कुठलेही दागिना किंवा वस्तू पीएसपीवर विकली जाईल. पीएसपी म्हणजे पटेल ज्वेलर्स का सही प्राईज पीएसपी ही किंमत इतर कुठल्याही ब्रँड किंवा दुकानांच्या तुलनेने कमीत कमी व योग्य भावात असेल.

ग्राहकांना यापुढे पटेल ज्वेलर्सच्या कोणत्याही शोरूममध्ये खरेदी करताना आता भाव करण्याची गरजच नाही. खरेदी करताना किमतीच्या दृष्टीने ग्राहक निश्चिन्त असेल. एखाद्या दागिना किंवा वस्तूची किंमत पटेल ज्वेलर्स च्या सर्व शोरूममध्ये सारखीच असेल जी फिक्स रेटला कमीत कमी व योग्य भावात असेल. कमीत कमी व योग्य भावात फिक्स रेट या धोरणाचे आमच्या ग्राहकांनी सुद्धा स्वागत केले आहे. आता यापुढे पटेल ज्वेलर्सच्या सर्व शोरूममध्ये खरेदी करताना ग्राहकांच्या मनात किमतींविषयी कोणतीही शंका नसेल. पटेल ज्वेलर्स यापुढेही आमच्या ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या पटेल ज्वेलर्सचा प्रयत्न राहील.

पटेल ज्वेलर्स या पनवेलमधील छोट्याशा दुकानापासुन ते पटेल ज्वेलर्स हा ज्वेलरी शोरूमच्या चेनचा ब्रांड कसा झाला या मागे विश्वास हीच परंपरा हे ब्रीद वाक्य आहे. पनवेलच्या जोशी आळी येथे अनेक छोटी-छोटी ज्वेलर्सची दुकाने होती त्यामुळे या गल्लीला पनवेलचा झवेरी बाजार हे नाव पडले या सर्व दुकानांच्या गर्दीमध्ये 1992 साली पटेल ज्वेलर्स या नावाने मगनभाई पटेल व प्रफुल्ल पटेल  व नवनीत पटेल यांनी 150 फुटाचे ज्वेलरीचे दुकान सुरू केले, हे छोटे दुकान अल्पावधित प्रसिध्द झाले.

ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे जागा अपुरी पडत होती. तेव्हाच याच दुकानाचा विस्तार करून याचे रूपांतर शोरूम मध्ये केले. ग्राहकांनी यांला चांगलाच प्रतीसाद दिला. परंतु थोडया वर्षातच आणखीन बदल झाले. ग्राहकाला अग्रभागी ठेवून भव्य शोरूम बनवली जात होती. आकर्षक रोशणाई, आधुनिक बिलींग, सी. सी. टीव्ही, ए.सी, ग्राहकांना बसण्यासाठी जागा हे सर्व नवीन शोरूम मध्ये अपेक्षीत होते. काळाची पाउले ओळखुन मगनभाई यांनी आपल्या शोरूमचे नुतूनीकरण केले. जेथे त्यांचे छोटे दुकान होते येथे पहिल्या मजल्या सहीत 7000 फुटाचे भव्य शोरूम आधुनिक सुविधांसहित पनवेल, रायगड व नवी मुंबई वासीयांसाठी खुले केले. तेथे आत्ता दुसर्‍या व तिसर्‍या मजल्याच्या वाढीव जागेत शोरूमचे काम चालू असून लवकरच 12000 फुटाची भव्य शोरूम ग्राहकांसाठी खुली होईल. पनवेलचे पटेल ज्वेलर्सचे नाव महाड, माणगाव, अलिबाग, पेण, रोहा, उरण, रायगड, नवी मुंबई  तसेच तळोजा, कल्याण, ठाणे, डोंबिवली येथे ही प्रसिध्द झाले आहे.

पटेल ज्वेलर्सच्या यशामागे मगनभाई पटेल, प्रफुल्ल पटेल व नवनीत पटेल यांची मेहनत आहे. पटेल ज्वेलर्स हा आता एक मोठा ब्रँड झाला आहे. आज पटेल ज्वेलर्समध्ये सर्व काही एकाच छताखाली मिळते. लेटेस्ट व्हरायटीमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, पारंपरिक दागिने, हॉलमार्क दागिने, तुमच्या डिझाईन्सनुसार बनऊन मिळणारे दागिने,  ब्रँडेड हिर्‍याचे दागिने, प्लॅटिनम दागिने, सोन्या – चांदीमध्ये  देवांच्या मूर्ती, दागिने व पूजेचे साहित्य, दागिने पोलिश, दागिने रिपेरिंग, दागिना ठेवणे व घेणे हे सारे पटेल ज्वेलर्स च्या सर्व शोरूममध्ये उपलब्ध आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply