मुंबई : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लतादिदींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लातादीदी यांच्या अंत्यदर्शनाला सायंकाळी 4 वाजता मुंबईत येणार आहेत.
Check Also
कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक
पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …