खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त : येथील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, संजय भोपी सोशल क्लब आणि आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांनी रविवारी (दि. 12) सकाळी नगरसेवक संजय भोपी यांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती (ब)च्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. खांदेश्वर तलावाच्या बाजूला गार्डनमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यकारी अभियंता या पदावर निवड झाल्याबद्दल संजय गणा पाटील यांचा, तसेच अलर्ट सिटीझन फोरमच्या अध्यक्षपदी आनंद पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. या वेळी खांदा कॉलनीमधील या चारही संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …