Breaking News

सीकेटी महाविद्यालयात कर्करोग दिनानानिमित्त ऑनलाइन अतिथी सत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त

04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन  विद्यार्थी-विद्यार्थीनीमध्ये कर्करोग तथा विशेषत्वाने स्तनांचा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराबद्द्ल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यु पनवेल (स्वायत्त) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि. 04 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 05:30 वाजता आभासी अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले.

प्रस्तुत अतिथी सत्रास अँस्टर आधार रुग्णालय कोल्हापूर येथील प्रख्यात ऑन्कोसर्जन डॉ. बसवराज कडलगे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना सीकेटी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.सुर्यकांत परकाळे यांनी महविद्यालयात राबविण्यात येणार्‍या बहुविध विद्यार्थीकेंद्रित आरोग्यविषयक उपक्रमाचा मागोवा घेताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांसोबतच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापनाकडून मिळणार्‍या अविरत सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.बसवराज कडलगे यांनी उपस्थितांना संबोधित करताना कर्करोग म्हणजे काय? यासोबतच महिला व युवतींमध्ये प्रकर्षाने उद्भवणार्‍या स्तनांचा कर्करोगाविषयी भाष्य करीत त्याची लक्षणे, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, एक्सरे यांसारख्या अद्यावत निदान प्रक्रियेबाबत भाष्य केले. त्यासमवेत स्तनांच्या कर्करोगाच्या उपचार पद्धती बाबत स्पष्टीकरण देताना आधुनिक व अत्यल्प त्रासदायक शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना यासंदर्भात न लाजता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला दिला.

अतिथी संबोधनानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरांचे संक्षिप्त सत्र झाले.  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.योजना मुनीव यांनी अतिथी परिचय दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पोर्णिमा गायकवाड या स्वयंसेविकेने केले, अंततः राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.अपूर्वा ढगे यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता केली.

याप्रसंगी एस.एम.डी.एल. कॉलेज कळंबोलीचे सहयोगी प्राध्यापक डॉ.बबन जाधव,  सीकेटी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी.आघाव, मानव्यविद्याशाखेचे शाखाधिपती प्रो.डॉ.बी.एस.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे शाखाधिपती प्रो.डॉ.एस.बी.यादव, विज्ञान विद्याशाखेच्या शाखाधिपती डॉ.ज्योत्सना ठाकूर, महिला विकास कक्ष तथा इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. आर.डी.म्हात्रे, सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा.प्रतिभा जाधव, आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.मंदा म्हात्रे व त्यांच्या विभागातील सहकारी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. तत्समवेत कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये राष्टीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा.सत्यजित कांबळे, डॉ.योजना मुनीव, प्रा. सागर खैरनार, प्रा.अपूर्वा ढगे, प्रा.आकाश पाटील यांनी विषेश परिश्रम घेतले.

जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित विषेश सत्राचे आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन लोकनेते मा.श्री. रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष मा.श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा.श्री. वाय.टी.देशमुख, आमदार मा.श्री. प्रशांत ठाकूर, संस्थ्येचे सचिव डॉ.एस.टी.गडदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना तथा प्राणीशास्त्र विभागाचे कौतुक केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply