Breaking News

तबेल्यातील मलमूत्राची तक्रार केल्याने जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील लाडीवली गावात म्हशींच्या तबेल्यातील मलमूत्र रस्त्याने वाहत असल्याबाबत आवाज उठवल्याने तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली गावात ग्रामपंचायतीकडून गटार साफसफाईचे काम सुरू होते. या कामात रस्त्यावरील गटाराचे स्लॅब तोडू नये, अशी सूचना ग्रामस्थ जगदिश दगडे यांनी केली होती. अनेक महिन्यांत तोडलेले स्लॅब पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे त्या भागात असलेल्या म्हशींच्या तबेल्यातील मलमूत्र रस्त्याने वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून रस्त्याच्या दुतर्फा असलेले गटार बांधण्याची मागणी जगदिश दगडे यांनी केली होती. त्यानुसार तिवरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सूर्यवंशी, उपसरपंच संजय तिखंडे तसेच सदस्य संतोष भासे हे तक्रारीप्रमाणे रस्त्याची व गटारांच्या पाहणीसाठी गेले असता नंदकुमार नाखते आणि बाळाराम नाखते हे घटनास्थळी धावत आले. त्या दोघांनी संतोष पवार यांच्या म्हशींच्या तबेल्याबाबत यापुढे तक्रार करू नये, अशी धमकी जगदिश दगडे यांना दिली.  या प्रकरणी लाडीवली गावातील ग्रामस्थ जगदिश दगडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 504, 506, 34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलमूत्र आणि शेण रस्त्याने वाहून जात असल्याबद्दल आवाज उठवणारे जगदिश दगडे हे पत्रकार तसेच यू ट्यूब वाहिनेचे संपादक आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply