Breaking News

शुभ वर्तमान! रायगडात कोरोना ओसरतोय!!; नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास     पर्यटक परतल्याने व्यावसायिकही खुश

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दहा तालुक्यात नवीन रुग्णसंख्या एक अंकीच आहे. रुग्णसंख्या झपाट्याने घटत चालली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, पर्यटक पुन्हा एकदा रायगडकडे वळलेत. त्यामुळे व्यावसायिकही खुश आहेत. रायगड जिल्ह्यात रविवारी 179 नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण घरातच राहून उपचार घेत आहेत. नव्याने आढळून होणारी रूग्णसंख्या आता खूपच कमी झाली आहे. रविवारी दिवसभरात म्हसळा व पोलादूपरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये अवघ्या 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागात 13 आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील 65 रुग्णांचा समावेश आहे. जनरल बेडमध्ये 46, ऑक्सिजन बेडवर 13, आयसीयूमध्ये 19, तर तीन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात होत असतानाच विविध सण तसेच नववर्ष स्वागताचे सेलिब्रेशन धूमधडाक्यात करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. दोन आठवड्यांच्या अंतरात दररोजची रुग्णसंख्या अडीच हजारांच्या वर पोहचली होती. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाच्या उरात धडकी भरली होती. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिल्याने रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी होते. आताही घरी उपचार घेऊनच रुग्ण बरे होत आहेत.

22 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 22 लाख पाच हजार 210 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 18 लाख 37 हजार 179 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. विशेष म्हणजे 15 ते 17 वयोगटातील 97 हजार 548  मुला-मुलींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 हजार 801 इतकी आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply