Breaking News

नेरळ भात खरेदी केंद्रावर पोत्यांचे ढीग; कळंब येथील गोडाऊनही भरलेलेच!

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कर्जत आणि नेरळ येथील हमीभाव भात खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर भात  पोहचले असून त्यामुळे शासनाचे गोडाऊन पूर्ण भरले आहेत. तेथे नवीन गोडाऊन बांधावे तसेच कळंब येथील भाताच्या पोत्यांनी भरलेले गोडाऊन रिकामे करून द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची आधारभूत किमतीने खरेदी केली जाते.  तालुक्यात कर्जत, कडाव आणि नेरळ येथे शासनाने नियुक्त केलेल्या संस्थांकडून भात खरेदी केली जात आहे. मात्र कर्जत येथील खरेदी विक्री संघ आणि नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या भाताची हमी भावाने खरेदी उपक्रमास शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कर्जतमधील दोन्ही गोडाऊन तर नेरळ येथील एकमेव गोदाम भाताने भरून गेले आहे. त्यामुळे भाताच्या गोणी गोडाऊनच्या बाहेर ठेवली जात आहेत. बदलत्या हवामानामुळे पाऊस कधीही येण्याची शक्यता असते. त्यामुळे गोडाऊन बाहेर ठेवलेली भाताची पोती अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने जमा झालेले भात येथून उचलून न्यावे आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सध्याची गोडाऊन कमी पडत असल्याने  भात साठवण करण्यासाठी शासनाने नव्याने गोदामे बांधावीत, अशी मागणी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी आणि कर्जत खरेदी विक्री संघाने तहसीलदारांकडे केली आहे. कळंब येथील गोदामात गेल्या वर्षी खरेदी करण्यात आणलेले भात अजूनही पडून आहे. ते उचलल्यास तेथे सुमारे 2500 क्विंटल भाताची साठवण तेथे होऊ शकते, अशी माहिती शेतकरी देत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply