महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी झालेल्या महापुरानंतर उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याने महाड पूरनियंत्रण समितीने शनिवारी (दि. 30) सरकारविरोधात आपला आक्रोश व्यक्त करीत मुंबई -गोवा महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरताना आठ महिने होऊनदेखील राज्य शासन पूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत असल्याचे दिसून आल्याने पूरनियंत्रण समितीने मुंबई -गोवा महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हजारो महाडकर नागरिक मुंबई -गोवा महामार्गावर नातेखिंड येथे जमले सुमारे दिड तास महामार्ग रोखून धरला. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांसह भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस महेश शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. मंजुषा कुद्रीमोती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई -गोवा महामार्ग तब्बल दिड तास बंद राहिल्याने महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
प्रमुख मागण्या
* नांगलवाडी येथील जुना पूल त्वरित काढावा
* सावित्री नदीपात्रातील जुठ्ठे व साठलेला गाळ काढावा
* दासगाव येथील रेल्वे ब्रिज भराव काढावा
* सीआरझेड नियम शिथिल करावे,
* नदीकिनारी साचलेला कचरा त्वरित काढावा
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …