Breaking News

वणव्यांमुळे सुधागड तालुक्यातील वनसंपदा, पशू-पक्षी होताहेत नष्ट ऐतिहासिक वारसेदेखील धोक्यात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील डोंगरांना लागणार्‍या वणव्यांमध्ये झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा होरपळून मृत्यू होत आहेत. सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. डोंगर-दर्‍यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. सुधागड तालुक्यातील किल्ले, गड, जंगल या ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. ऑक्टोंबरनंतर वाढत्या उष्म्याने ही झुडप व गवत सुकते आणि त्याला वणवा लागतो. या वणव्यांत  झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. पाली व सुधागड तालुक्यातील वणवे सजीवसृष्टी नष्ट करीत आहेत, वनविभागाने ही बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply