Breaking News

मुलांवर संस्कार करणे ही काळाची गरज -माधुरी मुळीक

कर्जत : बातमीदार

लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आई म्हणून आपली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी महिलांनी कुटुंबासाठी वेळदेखील द्यायला हवा, असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी केले. गुरुचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि रणरागिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ मोहाचीवाडी येथील शनी मंदिरात महिलांसाठी शिवणकला आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्ग तसेच बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवणकला आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेऊन, महिलांनी व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शिवणकला आणि ब्युटी पार्लर हे दोन्ही कोर्सेस पुढील दोन वर्षे चालतील एवढी नोंदणी झाली असल्याची माहिती गुरुचैतन्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी प्रास्ताविकात दिली. दोन्ही प्रशिक्षण वर्गाच्या प्रशिक्षिका वंदना मिश्रा आणि शिल्पा परदेशी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कर्जतच्या नगरसेविका स्वामींनी मांजरे, भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा शितोळे, जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे, अश्विनी शेळके, उपनिरीक्षक सोनी जवादे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भगत, संतोष भोईर, सचिव कैलाश खांगटे, सिराज शेख, वंदना भालेराव, संजय आदींसह  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply