नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी (दि. 26) पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची नावे जाहीर केली. यानिमित्ताने पक्षासाठी झटणार्या नेते, पदाधिकार्यांना राष्ट्रीय स्तरावर व व्यापक प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली आहे.
या कार्यकारिणीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
विनोद तावडे, पंकजा मुंडेंना संधी
महाराष्ट्रातील भाजपचे माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तावडे आणि मुंडेसोबतच विजया रहाटकर, सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचिटणीस म्हणून व्ही. सतीश, प्रवक्तेपदी संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
तेजस्वी सूर्या युवा मोर्चा अध्यक्षपदी
भाजपच्या नव्या विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर राजकुमार चहर यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …