Breaking News

महायुतीला महाप्रतिसाद; शेकापला गळती सुरूच; विरोधक बॅकफूटवर

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसे भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषत: शेतकरी कामगार पक्षाला पावसाप्रमाणे गळती लागली आहे. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीदेखील शेकापच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कास धरणार्‍या आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणार्‍या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विरोधक पुरते बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

-कामोठ्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहून विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत असून, कामोठे सेक्टर 34 येथील संस्कृती गृहनिर्माण संकुलातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात

स्वागत केले. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, रमेश म्हात्रे, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी कामोठे येथील शेकापचे विजय तळेकर, विजय घाडगे, विठ्ठल शिखर, पांडुरंग कुंभार, दत्तात्रय कुंभार, नवनाथ उगले, शरदचंद्र पाटील, संगीता घाडगे, रेश्मा साळवी, श्रुती शिंदे, अनिता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

-नेवाळीतील रहिवाशांनीही हाती घेतले ‘कमळ’

भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा ओघ सुरूच आहे. अशाच प्रकारे नेवाळी येथील कृष्णा अंगण कॉम्प्लेक्समधील अनेक रहिवाशांनी प्रफुल्ल वाझे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.

पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी नेवाळी येथील सुरेखा वझे, अरुणा निकम, विमल पिसाळ, वृषाली खळदे, सुचिता चव्हाण, सुशील चव्हाण, चंद्रशेखर सिंग यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजप नेते भीमसेन माळी आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply