Breaking News

फणसाड अभयारण्य पर्यटकांना खुले; रानगव्यांची संख्या वाढली

मुरूड : प्रतिनिधी

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने फणसाड अभयारण्य 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुरूडपासून 14 कि.मी. अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ 54चौ.कि.मी.आहे. याअभयारण्यात विविध वन्यजीव, अनेक सरपटणारे प्राणी व औषधी वृक्षांची संपदा आहे. बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी, मोठी खार अर्थात शेकरु हे जंगली प्राणी तसेच नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ्, धामण आदी सरपटणारे प्राणी या अभयारण्यात आहेत. अभयारण्यातील रानगव्यांची संख्या वाढली असून ती आठ वरून 18 झाली आहे. फणसाड अभयारण्यात बारमाही वाहणारे नैसर्गिक झरे आहेत. त्याला ग्रामीण बोलीत ’गाण’ म्हणतात. या अभयारण्यात सुमारे 27 गाणी आहेत.  फणसाड अभयारण्य हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या अभयारण्यात पर्यटकांची नेहमी वर्दळ असते मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे या अभयारण्यात येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply