Monday , June 5 2023
Breaking News

शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

मुरूड : प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 11) काम बंद आंदोलन केले आहे. मुरूड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, बांधकाम विभाग अधिकारी संजय वेटकोळी, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगावकर, साहिल मुजावर, कपिल वेहेले, गोपाळ चव्हाण, राकेश पाटील, चिदानंद व्हटकर, दिप्ती एरंडे, स्मिता मुरुडकर, स्वप्नजा विरुकुड, दीपक शिंदे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कामे सुरू ठेवण्यात आली होती. शाईफेकीच्या घटनेतील आरोपींना कोठर शिक्षा व्हावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंकज भुसे यांनी या वेळी दिली.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply