Monday , June 5 2023
Breaking News

हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने उपक्रम

पनवेल : वार्ताहर

नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभाग 18 मध्ये नाविन्यपूर्ण आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. माता भगिनींशी असलेला संवाद वाढवा आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांना काही क्षण विरंगुळ्याचे मिळावे या हेतूने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हळदीकुंकू संमारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला.

या वेळी वाण म्हणून भेटवस्तू माता भगिनींना देण्यात आले. मनोरंजन हेतूने संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा आणि इतर खेळही घेण्यात आले. माता भगिनींनी या खेळांमध्ये सहभाग घेऊन मनोसोक्त आनंद लुटला. कोरोना काळातल्या निर्बंधांमुळे महिलांना एकत्रित जमणे शक्य होत नव्हते, पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून आम्हाला बर्‍याच दिवसांनी एकत्र येण्यास आणि खेळांच्या माध्यमातून विरंगुळ्याचे क्षण लुटण्यास माध्यम दिले त्याबद्दल सर्व महिला वर्गांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.

या वेळी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यावतीने त्यांच्या पत्नी मोहिनी विक्रांत पाटील यांनी आलेल्या सर्व माता भगिनींचे स्वागत केले. प्रभागातील सर्व माता भगिनींना हळदीकुंकू समारंभात भाग घेता यावा यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply