Saturday , June 3 2023
Breaking News

उद्यानातील समस्या सोडवा -पांडुरंग आमले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सानपाडा सेक्टर 7 मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 7 मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने बसविलेले ओपन जीममधील साहित्याची दुरावस्था  झालेली आहे. साहित्य नादुरूस्त झाली आहेत. या साहित्याची लवकरात लवकर दुरूस्त झाली तर स्थानिक रहीवाशांना ओपन जीमच खर्‍या अर्थाने वापर करणे शक्य होईल. या मैदानात एका ठिकाणी असलेल्या गवतावर स्थानिक परिसरातील महिला सकाळच्या वेळी योगा करण्यात येत असतात, परंतु सकाळी उद्यानातील गवतावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने महिलांना योगा करणे शक्य होत नाही. त्यांनी योगासाठी आणलेले मॅट भिजत असल्याने योगा करता येत नाही, असे आमले यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाने त्या गवतावर सकाळी 10 नंतर अथवा दुपारनंतर पाणी मारल्यास सकाळच्या वेळी परिसरातील महिलांना या ठिकाणी योगा करणे शक्य होईल. या ठिकाणी ओपन जीममधील साहित्याची डागडूजी तसेच उद्यानातील पाण्याची वेळ बदलण्यास संबंधितांना सहकार्य करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply