Breaking News

पालीमध्ये एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना

पाली ः प्रतिनिधी

पाली व उन्हेरे फाट्यावर चार ठिकाणी चोर्‍या झाल्या आहेत. चोरट्यांनी घर, बियर शॉपी व गोडाऊन फोडून ऐवजाची चोरी केली तसेच दुचाकीही पळवून नेली आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आता चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या संदर्भात पाली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पालीतील कासारआळीत राहणार्‍या संगीता पाशिलकर यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरटे घरात शिरले आणि त्यांनी 42 हजारांची रोख रक्कम चोरली. या चोरट्यांनी उन्हेरे फाट्यावरील गौरी बियर शॉपीमधील 14 हजार 460 रुपये किमतीचे चार बिअर बॉक्स व सहा हजार रुपये चोरून नेले. त्याचप्रमाणे बसस्थानकाजवळील सम्राट सुपर मार्केटच्या गोडाऊनच्या गल्ल्यातील पाच हजार रुपये चोरले. याचबरोबर बल्लाळेश्वर नगरातील साजेकर चाळीत राहणारे संतोष यादव यांची घराबाहेर लावलेली 20 हजार रुपये किमतीची मोटरसायकल पळवून नेली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पालीत एका रात्रीत एवढ्या चोर्‍या झाल्याने चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि ती कायम ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply