Breaking News

क्लासला गेलेली दोन मुले बेपत्ता

पनवेल : बातमीदार

कळंबोली येथील क्लास सुटल्यावर बाहेर पडत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केले आहे. अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावीच्या क्लासला गेलेला 16 वर्षीय अभिषेक बाळासाहेब राखुंडे व दुसरा 14 वर्षीय अभय सुरेंद्र पांडे क्लासला गेले होते, मात्र ते घरी परत न आल्याने पालकांनी क्लासमध्ये त्यांच्याविषयी चौकशी केली असता

अभिषेक हा नेहमीप्रमाणे क्लासला आल्याचे व मित्र अभय पांडे याच्यासोबत क्लास सुटल्यावर गेल्याचे त्यांना या वेळी सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही मुलांचा कळंबोली तसेच कामोठे, खांदेश्वर, पनवेल आणि इतर परिसरात शोध घेण्यात आला, मात्र ते दोघे मिळून आले नाहीत. म्हणून या दोघा मुलांचे कोणीतरी अज्ञात इसमांनी अपहरण केले असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

-कळंबोलीतून तरुणीचे अपहरण

पनवेल : कळंबोली येथून एका 16 वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही तरुणी मामीला दुकानावर जाऊन भेटून येते, असे सांगून घराबाहेर पडली. ती दुकानावर गेली नाही व घरीही परत न आल्याने तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या तरुणीची उंची सुमारे 160 सेंमी, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ (मोठे), बांधा मध्यम, डाव्या हातावर ब्लेडने कापून घेतल्याचे निशाण आहे. तिने अंगात सफेद कुर्ता, काळ्या रंगाची जिन्स् पँट व चप्पल, सोबत ग्रे व सफेद रंगाची सॅग, क्रीम कलरचा स्कार्प आहे. त्याचप्रमाणे कानात पिवळ्या धातूचे टॉप्स, नाकात फुली, हातात स्टीलचा कडा, पायात पैंजण आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

-एसटीत चढताना पाकीट चोरले

पनवेल एसटी स्थानकात बसमध्ये चढत असताना एका व्यक्तीच्या पँटमधील पाकीट अज्ञाताने चोरल्याची घटना

घडली आहे. पनवेल स्थानकात अलिबाग गाडीत संदीप सातारे (56) हे बसमध्ये चढत असताना त्यांच्या पँटच्या पाठीमागील खिशातून तीन हजार रोख व ड्रायव्हिंग लायसन्स असलेले पाकीट अज्ञात चोरट्यांनी चोरले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

– गोदामातून मालाची चोरी

पनवेल : तळोजा एमआयडीसीतील गोदामातून 92 हजार रुपयांच्या मालाची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश रोडवेज ट्रान्सपोर्टचे गोदाम तळोजा एमआयडीसीत आहे. या गोदामात ठेवलेल्या ट्रान्सपोर्टच्या मालापैकी काही जुन्या टायरच्या डिस्क, पॉवर पॅक मशीन, जाईटींग पिन व जे. के. कंपनीचे दोन नवीन टायर असा एकूण 92 हजार रुपये किमतीचा माल चोरांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी विनोदकुमार सिंग, दिलीपकुमार सिंग व मकसूद खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply