कामोठे : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष कामोठे आणि प्रदीप भगत युवा मंचच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड व सिनियर सिटीझन कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कामोठे सेक्टर 22 येथील गंगा गॅलेक्सी सोसायटी मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कार्डचे वाटप केले.
कार्ड वाटप शिबिर 2 आणि 3 एप्रिलदरम्यान कामोठेमध्ये आयोजित करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट कार्डचे वाटप केले आणि आयोजकांचे कौतुक केले. या वेळी प्रभाग समिती ‘क’च्या सभापती अरुणा भगत, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होेते.