पनवेल : रामप्रहर वृत्त
जनसेवेच्या महान यज्ञामध्ये उल्लेखनीय योगदान देत भावी पिढीला प्रेरणा देणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र यांच्यातर्फे जीवन गौरव सन्मानाने गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय, साहित्य क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण कार्य क्षितिजावर तळपणाऱ्या सूर्यासारखे तेजोमय आहे, अशा शब्दांत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, रायगड उपाध्यक्ष अशोक घरत, सदस्य सुनील भोईर, उरण तालुकाध्यक्ष पूजा चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला. “जनसेवेच्या महान यज्ञामध्ये आपले योगदान उल्लेखनीय असून भावी पिढीला प्रेरणादायी आहे. आपले कार्य क्षितिजावर तळपणाऱ्या सूर्यासारखे तेजोमय आहे. पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे या तेजपुंजास गौरविताना आम्हास आनंद होत आहे,” असा आशय असलेले मानपत्र यावेळी प्रदान करण्यात आले.
पत्रकार उत्कर्ष समितीने केलेल्या या सन्मानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या सत्कार सोहळ्याला समितीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper