पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. येथील महापौर आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या सौजन्याने सोमवारी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले होते.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या उपक्रमाला वाहनचालकांचा आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले. जनतेच्या सुरक्षिततेशी निगडित असलेला हा उपक्रम राबवून आयोजकांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
या कार्यक्रमास नगरसेवक अजय बहिरा, सुमित झुंजारराव, सुनील बहिरा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गजानन घाडगे, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवणेकर, उमेश इनामदार, रूपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.
Check Also
आप्पाडी पोडू…पोडू
साऊथच्या गीत संगीत नृत्याचा तडका एकदम भारी आपण राजकारणाचे बाजूला ठेवू. ते आपल्याला समजेपर्यंत चाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper