Breaking News

पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील चेरीवली शाळा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दत्तक घेतली आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांचा बालमित्र सचिन पाटील यांच्या माध्यमातून शाळेला दरवर्षी एक लाख रुपयांची भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली जात आहे.
यंदा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेसाठी संगणक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक संतोष हेमाडे यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच शामकांत भालेकर, माजी सरपंच राजेंद्र भालेकर, सदस्य प्रदीप भालेकर आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply