Breaking News

वक्तृत्व स्पर्धेची सांघिक ढाल नेरळ महाविद्यालयाने जिंकली

कर्जत : बातमीदार

विद्या मंदिर मंडळाच्या शांताबाई नाडकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाने सांघिक ढाल पटकावली.

नेरळ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शांताबाई नाडकर्णी स्मृती वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रायगड आणि ठाणे जिल्हा आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत अंबरनाथ, कर्जत, खालापूर तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कल्याण येथील प्रा. भाऊ हरड आणि बदलापूर येथील डॉ. नितीन आडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

नेरळ विद्या विकास शाळेचा प्रथमेश नंदकुमार इंगळे हा या स्पर्धेत पहिला आला.

तसेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटात सर्वाधिक क्रमांक पटकावल्याने नेरळ विद्या मंदिर शाळेला स्पर्धेची सांघिक ढाल देण्यात आली.

शिक्षण तज्ज्ञ आसावरी काळे, विद्या मंदिर मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार, सदस्य सूर्यकांत जाधव, डॉ. मिलिंद पोतदार यांच्यासह मुख्याध्यापक पी. बी. विचवे, उपमुख्याध्यापक ए. एम. गुडदे, पर्यवेक्षक एम. के. परदेशी, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एस. एस. मेहेंदळे, आर. बी. बागुल, टिपणीस वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे आदी या वेळी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply