Breaking News

खारघरमध्ये शाश्वत फाउंडेशनतर्फे होळी मिलन आणि हास्य कविसंमेलन

पनवेल : प्रतिनिधी

होळी निमित्त खारघर येथे शनिवारी शाश्वत फाउंडेशन आयोजित होळी मिलन आणि हास्य कविसंमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी कवींनी आपल्या विनोदी कवितातून पर्यावरण जागृतीचा संदेश उपस्थितांना दिला.

खारघर सेक्टर 19मध्ये शाश्वत फाउंडेशनच्या बिना गोगरी व जयेश गोगरी यांनी शनिवारी (दि. 19) सायंकाळी होळीनिमित्त होली मिलन आणि हास्य कविसंमेलन आयोजित केले होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी कवि जय प्रकाश त्रिपाठी, अरविंद शर्म राही,  सुनील सावंरा, प्रेमलता त्रिपाठी आणि डॉ. मुकेश गौतम यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांना हसवताना त्यांना पर्यावरणाबाबत जागृत राहण्याचा संदेश दिला. डॉ. भावना सिंह यांचे सूत्र संचालनाला ही रसिकांना भरपूर दाद दिली.

या कार्यक्रमाला उद्योजक प्रमोद चौधरी, ललित चौधरी, नेटिव्ह फ्रेश मिल्कचे विलास लांडगे, पंकज पटेल, रामजी बेरा, अभिमन्यु पाटील, वासुदेव पाटील, प्रवीण पाटील, अंबालाल पटेल, विजय मालंडकर, किरण पाटील आदींचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शाश्वत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply