
रोहा ः प्रतिनिधी
कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला़, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली या भागांना अन्नधान्य देऊन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मदत करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश सर्कले यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास एनएसएसचे प्रमुख प्रा. अनिरुद्ध मोरे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रमुख प्रा. सावळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन आपापल्या परीने अन्नधान्याची मदत केली. त्यात तांदूळ, डाळ, साखर, बिस्किटे व इतर उपयुक्त साहित्याचा समावेश होता. हे सर्व सामान पेण तहसील कार्यालयात पूरग्रस्तांसाठी सुपूर्द करण्यात आले.